औरंगाबाद:आज जगभरात जागतिक दुध दिन म्हणून साजरा केला जातो. भारत देश हा कृषी प्रधान देश असून दुध उत्पादनात नेहमीच अव्वलस्थानी राहिला आहे. तसेच शेतीस धंद्या म्हणून शेतकर्यांच्या उपजीविकेचे महत्वाचे साधन बनले आहे. यात जिल्ह्यात चालुवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रतिदिन दुध संकलनात 5 ते 6 हजार लिटरने कमी झाले आहे.
आज एक जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा होत असताना दूध या विषयावर होत असलेले दुष्काळाचे सावट हे चिंतेचा विषय बनत आहे. राज्यासह जिल्ह्यात जनावरांचा चार्याचा प्रश्न तसेच पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने दूध उत्पादक क्षमता ही कमी होत असल्याचे दिसत आहे. यातच दुधाची दर्जा गुणवत्ता भेसळ आधी विषयात दूध संकलन होताना होणार्या अडचणी यातून जिल्ह्यात प्रति लिटर दुधाचा क्षमता कमी होत जात आहे. अशा परिस्थितीत दूध संकलन वाढविण्यासाठी शेतकर्यांना योग्य ती मदत ही शासनाद्वारे पोहोचत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना जनावरांसाठी खार्द्य व चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने आजघडीला शेतकरी हे आपली जनावरे चारा छावणीत दाखल करत आहेत. चाराप्रश्न हा गंभीर समस्या शेतकर्यापुढे असताना जनावरांना मिळणारा चार्याचे प्रमाण कमी असल्यास दुध उत्पादन देखिल कमी होणारच. जिल्ह्यातील दूध हे संकलनात कमतरता आल्यास त्याचा फटका हा शेतकर्यांसह दूध उत्पादक संघांना देखील बसणारच झाला.
दुष्काळाचा फटका
दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या सार्या सह पाण्याचा प्रश्न हा शेतकर्यांना चिंतेत टाकत आहे. यातच दूध देणार्या जनावरांचे चारापाणी हे कमी झाल्याने त्यांच्याकडून दूध संकलन कमी होत जाते. जिल्ह्यात गाय आणि म्हशी यांच्या दुधाची मागणी अधिक असताना औरंगाबाद तालुका परिसरातील सिंधोन, बिंधोन येथील दुध उत्पादक शेतकर्यांना देखिल कमी दुध निमित्ती होत असल्याने शहरास दुध पुरवठा हा कमी करावा लागत आहे.
दूध संकलनात कमतरता
जिल्ह्याभरातून होत असलेल्या दूध संकलनात यावर्षी तफावत निर्माण झाली आहे. दरवर्षी 1.12 लाख लिटर दूध संकलन होत असताना मागील तीन महिन्यात 5 ते 6 हजार लिटरचा फरक पडला असून प्रतिदिन 1.6 लक्ष प्रति लिटरच्याखाली शेतकर्यांकडून दूध डेअरीसाठी संकलन होत आहे. असे असताना देखिल दुष्काळाची दाहकता लक्षात घेत दूध संघाकडून दुधाच्या दरात कमतरता न आनता 25 रूपये प्रतिलिटर या दराने शेतकर्यांकडून दूध विकत घेतले जात आहे. पूर्वी अनुदान असतानादेखील या दरातून दूध संकलन केले जात. मात्र आता अनुदान मिळत नसताना देखिल शेतकर्यांवर बोजा पडू नये, याकरिता दरात कोणताही बदल अद्याप करण्यात आलेला नाही.
-डॉ.पी.बी.पाटील
व्यवस्थापकीय संचालक,
महानंद दूध